मुंबई : आपण अहमदाबादमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. मी कोणालाही भेटलेलो नाही आणि कोणाची भेट झालेली नाही, असा दावा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेत नारायण राणे यांनी भेटीच्या वृत्ताचे खंडन केले.
भाजपची मला जुनीच ऑफर आहे. भाजपचे नेते विचारत असतात. बाजारात चांगला माल असेल तर सगळेच विचारतात. मी विमानतळापासून हॉटेलपर्यंत माझ्या गाडीने गेलो. माझ्याकडे मर्सिडीस गाडी होती. तुम्ही जी गाडी दाखवतायत त्या गाडीने मी गेलो नाही, असे राणे यांनी म्हटले.
मी अहमदाबादला माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहला भेटललो नाही. माझ्यासोबत पोलीसही होते. त्यामुळे गुप्त भेटीचे सोडून द्या, असे राणे यांनी सांगितले.
मला भाजपमध्ये येण्यासाठी कोणी संपर्क केलेला नाही. कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा असेल तर असे खुलेआम चर्चा होत नाही. संदिग्धता कायम ठेवावी लागते. माझा निर्णय काय तो आज सांगणार नाही. भाजपात जाणार किंवा नाही याबाबत राणेंनी संदिग्धता कायम ठेवली आहे.
भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाही आणि चर्चाही नाही. राहुल गांधींबरोबर अर्धा तास चर्चा झाली. मी त्यांच्याकडे काही तक्रार केली. पण माझी तक्रार कायम आहे. तक्रारीचं निवारण अद्याप झालेले नाही, असे सांगत काँग्रेसवर राणेंनी दबाव वाढवला आहे.