स्थानिक निवडणुकीत भाजपची 'पंचाईत'

महाराष्ट्रात काल लागलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूण ३३१ जागांपैकी काँग्रेसने १०४ जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीने ७८ जागावर बाजी मारली आहे. 

Updated: Jan 12, 2016, 06:07 PM IST
स्थानिक निवडणुकीत भाजपची 'पंचाईत'     title=

 मुंबई  : महाराष्ट्रात काल लागलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूण ३३१ जागांपैकी काँग्रेसने १०४ जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीने ७८ जागावर बाजी मारली आहे. 
  

सत्ताधारी शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहे, तर मुख्य सत्ताधारी भाजपला केवळ ३३ जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. 

  
 गृहराज्य मंत्री राम शिंदे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगली आघाडी मिळाली आहे. 
 
 शिवसेनेचे यश 
 शिवसेनाला ताळा आणि पोलादपूर येथे बहूमत मिळले आहे. येथील प्रत्येकी १७ जागांपैकी १० आणि १२ जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. 
 मुंबई आणि अहमदनगर पालिकेतील एक एक जागा जिंकण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. 
 
 काँग्रेसचे यश  
 महाराष्ट्रातील १७ नगर परिषद आणि ३३१ नगर पंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. त्यातील १०४ जागांवर काँग्रेसला यश मिळले तर ७ नगर परिषदा काँग्रेसने काबिज केल्या आहेत. 

 
काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातील नायगाव आणि हिमायतनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदूरबार जिल्ह्यातील आक्राणी आणि चंद्रपूर जिल्ह्याती जिवती आणि कोरपना येथे काँग्रेसला बहुमत मिळाले. नाशिक दिंडोरीमध्ये सर्वात मोठ्या पक्षाच्या रुपात ते निवडून आले.