भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

केंद्रात हातात हात घालून सत्तेत बसले असले तरी भाजपनं पुन्हा एकदा शिवसेना खासदारांना डावललंय. 

Updated: Jan 12, 2016, 03:41 PM IST
भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक  title=

मुंबई : केंद्रात हातात हात घालून सत्तेत बसले असले तरी भाजपनं पुन्हा एकदा शिवसेना खासदारांना डावललंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'स्किल इंडिया' या योजनेचा एक कार्यक्रम आज मुंबईत पार पडतोय. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या मुंबईतल्या एकाही खासदाराला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. 

राजशिष्टाचाराप्रमाणे सत्तेत हातमिळवणी करणाऱ्या शिवसेना खासदारांना या कार्यक्रमाला बोलावलं जाणं अपेक्षित होतं, परंतु या सेना खासदारांना याबद्दल कोणत्याही प्रकारे आमंत्रण देण्यात आलेलं नाही. 

भाजपनं पुन्हा एकदा दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे सेना खासदारांनी नाराजी व्यक्त केलीय. 

राष्ट्रीय उद्योग आणि कौशल्य परिषद होती मुंबईत आयोजित करण्यात आलीय. या राष्ट्रीय परिषदेसाठी वेगवेगळ्या सरकारी विभागा आणि इंडस्ट्रीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.