मुंबईत भाजप लढवणार 192 जागा, उरलेल्या जागा मित्रपक्षांना

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती झाली आहे.

Updated: Feb 3, 2017, 04:05 PM IST
मुंबईत भाजप लढवणार 192 जागा, उरलेल्या जागा मित्रपक्षांना title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामबरोबर युती झाली आहे. मुंबईमध्ये भाजप 192 जागा लढणार आहे, तर आरपीआयला 25, रासपला 6 आणि शिवसंग्रामला 4 जागा मिळणार आहेत. 

तसंच मुंबईत महायुतीचं सरकार आलं तर उपमहापौर आणि स्थायी समितीचं मुख्य स्थान आरपीआयला दिले जाईल, असं वक्तव्य विनोद तावडेंनी केलं आहे. भाजपनं दिलेल्या 192 उमेदवारांपैकी 120 उमेदवार मराठी तर 72 उमेदवार अन्य भाषिक असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी 89 उमेदवार पदवीधर आहेत.