भाजपचा पुन्हा मित्र पक्षांना ठेंगा, उद्धव ठाकरेंचा चिमटा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा इथं मंगळवारी रात्री महायुतीची बैठक पार पडली. 

Updated: Mar 9, 2016, 11:59 AM IST
भाजपचा पुन्हा मित्र पक्षांना ठेंगा, उद्धव ठाकरेंचा चिमटा title=

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा इथं मंगळवारी रात्री महायुतीची बैठक पार पडली. मात्र, मित्र पक्षांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचा ठेंगा दाखविण्यात आलाय. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यात शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाषणाचा मान देण्यात आला. निर्णय घेताना सगळ्यांना विश्वासात घ्या, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. या राज्यातील जनतेने आपणास निवडून दिले आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी आपण झटू या. राज्यात आज भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सरकार म्हणून आपण जनतेचे पालक होऊ या, जनतेचे प्रश्‍न सोडवू या. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देताना जनतेच्या पालकत्वाची जबाबदारी या सरकारने घेतली.

बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही विषय न काढल्यानं किमान महामंडळांचं तरी वाटप करा, असा आक्रमक पवित्रा घटक पक्षांनी घेतला. भाजपच्या मित्र पक्षांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कौतुक केले. शिवाय भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी असल्याचे म्हणत अजितदादा आपण एकत्र आलो तर...असा सूर लगावला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती.

या राज्यातील जनतेने आपणास निवडून दिले आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी आपण झटू या. राज्यात आज भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सरकार म्हणून आपण जनतेचे पालक होऊ या, जनतेचे प्रश्‍न सोडवू या, असे उद्धव म्हणालेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देताना जनतेच्या पालकत्वाची जबाबदारी या सरकारने घेतली