www.24taas.com, मुंबई
भारताचा अनुभवी स्पिनर हरभजन सिंगनं मुंबईतील अंधेरीमध्ये क्रिकेट ऍकेडमी काढण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. भज्जीच्या या क्रिकेट ऍकेडमीला भाजपनं विरोध केलाय, तर मनसेनंही परप्रांतियांचा सूर आळवलाय.
टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंगनं क्रिकेट ऍकेडमी काढण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. भज्जीला अंधेरीमध्ये क्रिकेट ऍकेडमी काढायची आहे. त्यामध्ये भज्जी महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा त्याचा विचार आहे. गरीब मुलांनाही तो सवलतीत क्रिकेटचे धडे देणार आहे. भज्जीच्या या क्रिकेट ऍकेडमीला भाजपनं मात्र विरोध केलाय. मुंबई महापालिकेची जागा कोणत्या निकषांवर देण्याचा घाट घातला जातोय, भाजपचा सवाल आहे. तर हरभजन सिंग पंरप्रातीय असल्यानं राज्यातल्या मराठी खेळाडूंना प्राधान्य द्यावं अशी मागणी मनसेनं केलीयं.
पंजाबमधल्या क्रिकेट ऍकेडमी प्रमाणेच हरभजन सिंगला मुंबईत ऍकेडमी सुरू करायची आहे. पण भाजप, मनसेचा विरोध लक्षात घेता, ती प्रत्यक्षात येणार का, हे पहावं लागेल