काँग्रेसकडून 'दादा'ना नाही, 'भाईं'ना तिकीट

येत्या २७ तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला. अर्ज भरते वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते,  अनिल परब, सुनील प्रभू यांच्या सेनेचे अनेक पदाधिकारी कदमांसोबत हजर होते. तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप यांनी अर्ज भरला.

Updated: Dec 7, 2015, 11:03 PM IST
काँग्रेसकडून 'दादा'ना नाही, 'भाईं'ना तिकीट title=

मुंबई : येत्या २७ तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला. अर्ज भरते वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते,  अनिल परब, सुनील प्रभू यांच्या सेनेचे अनेक पदाधिकारी कदमांसोबत हजर होते. तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप यांनी अर्ज भरला.

यामुळे नारायण राणे यांची विधान परिषदेतून विधीमंडळात जाण्याची शक्यताही मावळली आहे. मुंबई विधान परिषद स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार 9 डिसेंबरला अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. १२ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येतील तर २७ डिसेंबरला मतदान होणार आहे.

दरम्यान आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही आघाडी जाहीर केली. काँग्रेस चार तर राष्ट्रावादी ३ ठिकाणी निवडणूक लढणार आहे. तर मुंबईतली एक जागा रिकामी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.