दाऊदच्या मालमत्ता लिलावात भाग घेणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

१९९२ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि देशातील मालमत्तेचा लिलाव करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस.बालाकृष्णन यांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळवल्यानंतर त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकीलने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Updated: Dec 7, 2015, 01:57 PM IST
दाऊदच्या मालमत्ता लिलावात भाग घेणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : १९९२ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि देशातील मालमत्तेचा लिलाव करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस.बालाकृष्णन यांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळवल्यानंतर त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकीलने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दाऊदच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याच्या शासनाने निर्णय घेतला असून हा लिलावातील पाखमोडिया रोडवरील दिल्ली जायका या हॉटेलची जाहीर लिलाव बुधवारी होणार आहे. यासाठी ज्येष्ठ प्रत्रकार एस. बालाकृष्णन यांनी लिलावात भाग घेण्याची इच्छा दर्शवल्यानंतर त्यांना शुक्रवारी छोटा शकिलच्या गुंडानकडून जिवे मारण्याच्या धमकी देणारा फोन आल्याचे सांगण्यात आले आहे.

डॉनला हादरा, दाऊदची मालमत्तेचा होणार लिलाव

याविषयी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बालाकृष्णन यांनी सांगितले मी या लिलावात सहभागी होणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे पोलिसांचे संरक्षण घेणार नाही.

 

दाऊदच्या मालमत्ताची लिलावाची जबाबदारी अश्विन एण्ड कंपनीला देण्यात आली आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.