पत्नीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पाळीव कुत्र्यांची रवानगी केली फार्म हाऊसवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या घरातील सर्व कुत्र्यांची आपल्या कर्जतच्या फार्म हाऊसवर रवानगी केलीय. काल राज ठाकरेंकडील बॉण्ड या कुत्र्यानं पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला चावा घेतला. यात शर्मिला ठाकरे जखमी झाल्या आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Updated: Aug 20, 2015, 12:07 PM IST
पत्नीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पाळीव कुत्र्यांची रवानगी केली फार्म हाऊसवर title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या घरातील सर्व कुत्र्यांची आपल्या कर्जतच्या फार्म हाऊसवर रवानगी केलीय. काल राज ठाकरेंकडील बॉण्ड या कुत्र्यानं पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला चावा घेतला. यात शर्मिला ठाकरे जखमी झाल्या आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शर्मिला ठाकरे यांना तब्बल ६५ टाके पडलेत. एवढंच नव्हे तर गरज पडल्यास त्यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागू शकते, अंस हिंदुजामधील डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता नाराज झालेल्या राज ठाकरेंनी जेम्स, बॉण्ड आणि शॉन या तीन कुत्र्यांची रवानगी फार्म हाऊसवर केली. 

राज ठाकरे यांनी याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शर्मिला ठाकरे यांचा पाय चुकून कुत्र्यावर पडला आणि त्यानं चावा घेतला.  दरम्यान, शर्मिला ठाकरे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.