१० लाखांच्या पुरस्कारतील १० पैसे स्वत:साठी : बाबासाहेब पुरंदरे

सहा महिने मी विचार करीत होतो. मी देखाव्यासाठी शिवचरित्र्य लिहीले नाही. ते लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कोणत्या पद्धतीने मी लिहू, यासाठी मी सहा महिने विचार केला. अहंकाराचा वारा मनाला न लागो. एव्हढे कष्ट करुन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, त्या आईच्या गर्भापर्यंत  इतिहास गेला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न केला. मी फक्त १० लाख रुपयांच्या पुरस्कारातून स्वत:साठी १० पैसेच घेणार आहे, असे शिवसाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाहीर केले.

Updated: Aug 19, 2015, 10:46 PM IST
१० लाखांच्या पुरस्कारतील १० पैसे स्वत:साठी : बाबासाहेब पुरंदरे title=

मुंबई : सहा महिने मी विचार करीत होतो. मी देखाव्यासाठी शिवचरित्र्य लिहीले नाही. ते लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कोणत्या पद्धतीने मी लिहू, यासाठी मी सहा महिने विचार केला. अहंकाराचा वारा मनाला न लागो. एव्हढे कष्ट करुन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, त्या आईच्या गर्भापर्यंत  इतिहास गेला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न केला. मी फक्त १० लाख रुपयांच्या पुरस्कारातून स्वत:साठी १० पैसेच घेणार आहे, असे शिवसाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाहीर केले.

'महाराष्ट्र भूषण' हा मोठा सन्मान आहे. या पुरस्काराचा मी अतिशय जबाबदारीने स्वीकार करत असून त्यामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे, असं बाबासाहेब यावेळी म्हणाले. बुधवारी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९४ व्या वाढदिनी त्यांचा राजभवनातील छोटेखानी पण दिमाखदार सोहळ्यात राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आज मी दहा लाखांनी श्रीमंत झालेलो आहे. परंतु, पुरस्काराच्या रक्कमेतील फक्त १० पैसे स्वत:साठी घेणार असून पुरस्काराचे १० लाख आणि माझ्याकडील १५ लाख, असे २५ लाख रुपये कर्करोग (कॅन्सर) झालेल्या रूग्णांच्या उपचारांसाठी देणार आहे. तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाला मदत करणार असल्याचं ते म्हणाले.

चर्चा, चिकित्सा, मूल्यांकनातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीपासून प्रेरणा घेऊनच शिवचरित्र लिहिले असल्याचे ते म्हणाले. इतिहास हे मौलिक धन आहे. ते माझे एकट्याचं नसून ते सर्वांचे आहे, त्यामुळे त्याचा अवमान करता कामा नये.  मला कधीही अहंकाराचा वारा लागला नाही आणि लागूही देणार नाही, असंही बाबासाहेब पुढे म्हणाले. 

मी सतत विचार करीत होतो. सहा महीने विचार करीत होतो. महाराष्ट्रात विविध ठिकाणी गेलो. ९ भाषा येणारा आणि २५ पुस्तक लिहिणारा ग. ह. खरेंसारखा श्रेष्ठ गुरू लाभला. लोकांना समजणार नसेल, पोहोचणार नसेल, खेड्यापाड्यात जाणार नसेल तर काय उपयोग? शिवाजी महाराजांच्या कालखंडातली पाच लाख कागदपत्रे राजस्थानमध्ये बिकानेर येथील संग्रहालयात आहे. कुणीतरी अभ्यास करायला हवा. म्हणून इतिहास संशोधक महामंडळाच्या माध्यमातून एक खंड लिहिला, असे बाबासाहेब पुरंदरे म्हणालेत.

भगवत गीतेचे तत्वज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर सोप्या मराठीत ज्ञानोबांनी पोहोचवलं. आणि मला मार्ग सापडला. लोकांपर्यंत पोचावं म्हणून अशा शैलीत मी शिवचरीत्र लिहिले. लोकांना ही शैली आवडली, त्यांनी माझं शिवचरीत्र, लेखन स्वीकारले. शिवशाहीरमध्ये सोपी भाषाशैली वापरली. लोकांना आवडली. त्यांचे मी आभार मानतो, असे ते म्हणालेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.