सुधींद्र कुलकर्णी यांना अभिनेते अनुपम खेर यांचा बोचरा सवाल

पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांना देशात निमंत्रण देऊन पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भाजपचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आता चोहोबाजुने टीका होतेय. चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी बोचरा सवाल विचारलाय, कुलकर्णी… तुमच्या बायको-मुलीची छेड काढणार्‍या शेजार्‍याला घरी मेजवानीला बोलवाल काय?

Updated: Oct 15, 2015, 11:36 AM IST
सुधींद्र कुलकर्णी यांना अभिनेते अनुपम खेर यांचा बोचरा सवाल title=
छाया - पीटीआय

मुंबई : पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांना देशात निमंत्रण देऊन पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भाजपचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आता चोहोबाजुने टीका होतेय. चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी बोचरा सवाल विचारलाय, कुलकर्णी… तुमच्या बायको-मुलीची छेड काढणार्‍या शेजार्‍याला घरी मेजवानीला बोलवाल काय?

अनुपम खेर यांनी शिवसेनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी शाई फेकून जो निषेध केलाय. त्याचे एकप्रकारे समर्थन केलेय. प्रत्येक देशभक्ताच्या राग शाई फेकण्यातून बाहेर पडलाय, असे खेर यांनी म्हटलेय. कुलकर्णींनी कसुरींपुढे पायघड्या घालून लाखो-करोडो भारतीयांच्या भावनांचा घोर अपमान केल्याचे ते म्हणालेत.

अधिक वाचा : सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!

भारताविरोधात दहशतवादी कारवाया पाकिस्तानकडून होत आहेत. असे असताना खुर्शिद मेहमूद कसुरी यांना देशात बोलविण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यानंतर अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली. 

अधिक वाचा : राज्याचं 'बनाना रिपब्लिक' बनवू देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला फटकारलं

पाकिस्तानशी असलेले आपले संबंध सर्वांना माहिती आहेतच. अशावेळी कस्तुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत आयोजित करण्याचे कारणच काय, या प्रकाराने मी अत्यंत व्यथित झालो आहे, असे खेर म्हणाले. 

अधिक वाचा : शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन

कोट्यवधी भारतीयांच्या नजरेतून बघितले तर कुलकर्णी यांचे वागणे अत्यंत बेजबाबदार आणि असंवदेनशील आहे. पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवाद पोसतोय. भारतात अतिरेकी हल्ले करतोय. सीमेवर आपल्या जवानांचे शीर कापले जात आहे. देशात बॉम्बस्फोट घडवून आणत आहे. अशा परिस्थितीत कुलकर्णीनी कसुरींना बोलावून देशप्रेमी भारतीयांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असे खेर म्हणालेत.

अधिक वाचा : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदींना टोला

कलाकारांचे एक वेळ समजू शकतो, पण कसुरी हे काही कलाकार नाहीत, मग त्यांना बोलावण्याची गरजच काय? अनेक पाकिस्तानी कलाकार आपल्या देशात येतात, चित्रपटात काम करतात, त्यांचे चित्रपट सुपरहिट होतात. ते निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोनातून येतात. खरं तर आपणच त्यांच्यावर उपकार करीत आहोत. पाकिस्तानात कार्यक्रम करण्यासाठी मी अनेक वेळा व्हिसासाठी अर्ज केला होता, पण तो सतत फेटाळण्यात आला, असे खेर यांनी यावेळी सांगितले.

पाहा नेमकं काय म्हणालेत, अनुपम

दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांना हद्दपार करा, असा सूर गायक अभिजित भट्टाचार्य याने लावला.भारतीय कलाकार असताना पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला, असा सवाल उपस्थित केला. आपले कलाकार इमानेइतबारे आयकर भरतात, पाकिस्तानी कलाकार तर हवालामार्गे पैसे घेतात, अशी खरमरीत टीका गायक अभिजित भट्टाचार्य यांनी केली. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत गायक अभिजित यांनी ही टीका केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.