‘हो हे शक्य आहे’... मनसेचं एक पाऊल पुढे

घटस्थापनेच्या दिवशी मनसेची ब्ल्यू प्रिंट प्रकाशित होतेय.  जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया, 'हो, हे शक्य आहे'... अशी कॅचलाईन असलेली मनसेची ब्लू प्रिंट २५ सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेच्या दिवशी प्रकाशित होणार आहे. 

Updated: Sep 22, 2014, 09:38 PM IST
‘हो हे शक्य आहे’... मनसेचं एक पाऊल पुढे title=
फाईल फोटो

मुंबई : घटस्थापनेच्या दिवशी मनसेची ब्ल्यू प्रिंट प्रकाशित होतेय.  जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया, 'हो, हे शक्य आहे'... अशी कॅचलाईन असलेली मनसेची ब्लू प्रिंट २५ सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेच्या दिवशी प्रकाशित होणार आहे. 

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा रंगणार आहे.... मी तुम्हाला ऐकायला किंवा पहायला बोलवत नाही, तर आपला महाराष्ट्र मोठा करण्यासाठी मला तुमची साथ हवी म्हणून बोलावतोय, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. 

'विकासाचा आराखडा तयार करणं हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता, त्यासाठी वेळ लागला कारण आम्ही जसजसा शोध घेत गेलो तशतशा आम्हाला महाराष्ट्राविषयी नव्या गोष्टी सापडत गेल्या, या विकास आराखड्याला वेळ लागल्याबद्दल टीकाही झाली... अजूनही ते काम पूर्ण झालं नाही... कारण समाज, परिस्थिती आणि वातावरण सतत बदलत असतं आणि ही सतत चालणारी प्रक्रिया आहे’, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.