१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील जीआर (अध्यादेश) सरकारने काढला आहे. 

Updated: Apr 21, 2015, 08:02 PM IST
१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक title=

मुंबई : पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील जीआर (अध्यादेश) सरकारने काढला आहे. 

आधार कार्डचा नंबर विद्यार्थ्याच्या प्रवेश क्रमांकाशी जोडावा, असाही आदेश सरकारने काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढण्यात आलेल्या या अध्यादेशानुसार शाळांनी प्रवेश दिलेल्या प्रत्येक बालकाचे आधारकार्ड 27 एप्रिल ते 26 जून या कालावधीत निश्चित करण्यात यावे. 

सरकारचे राज्यातील सर्व शाळांना आदेश देण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.  हा आधार कार्ड बनवून घेण्याची जबाबदारी शाळांची असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. 

गावात जिल्हाधिकारी या कामासाठी येतील त्यावेळी शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती पुरवावी. बाजार, रेल्वे स्थानक, बसस्थानकावर याबाबत पत्रे लावावीत
प्रचार आणि प्रसार करावा, तसेच शिक्षकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करावा, असेही नमूद करण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.