गिरगावात ६० फुटी रावण!

दसऱ्याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दसरा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उभारला जाणारा ६० फुटी रावण...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2013, 10:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दसऱ्याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दसरा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उभारला जाणारा ६० फुटी रावण...
यंदाचं इथं हा महोत्सव साजरा होण्याचं ५० वं वर्ष आहे. अर्थातच, यंदा हा महोत्सवाची रंगतही वाढलीय. इथं, सध्या रावणाच्या प्रतिकृती अधित आकर्षक बनवण्यात आल्या आहेत. यंदाच्या उत्सवात लोकांना पाहायचाय तो इथली रावणाची प्रतिकृती... इथं यावर्षी उभारली जाणारी रावणाची प्रतिकृती ५५ ते ६० फूट उंच बनवण्यात येत असल्याचं सांगितलं जातंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.