VIDEO : कॉलेजच्या परिसरात मुलींमध्ये जोरदार हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video of Girls Fight : सोशल मीडियावर मुलींच्या कॉलेजमधील या भांडणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 22, 2024, 04:23 PM IST
VIDEO : कॉलेजच्या परिसरात मुलींमध्ये जोरदार हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल  title=
(Photo Credit : Social Media)

Viral Video of Girls Fight : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा फॅशन, डान्स किंवा मग विनोदी गोष्टी आणि प्रॅंक असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून काही व्हायरल होतं तर ते म्हणजे कॉलेज कॅम्पसमधील व्हिडीओ... अर्थात अनेकदा हे व्हिडीओ मजेशीर किंवा कोणत्या इव्हेंटमधील असतात. पण यावेळी व्हायरल होणार हा व्हिडीओ कॉलेजमध्ये मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ दिल्ली एनसीआरच्या नॉलेज पार्क येथे असलेल्या एका कॉलेजमधील आहे. या कॉलेजमध्ये दोन मुलींमध्ये मारहाण झाली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना कॉलेज कॅम्पसमध्ये झाली. यात दोन्ही मुलींमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला आणि त्यात त्यांच्यात भांडण झालं. 

या व्हिडीओत पाहायला मिळतंय की एक मुलगी दुसऱ्या मुलीचे केस खेचत मारताना दिसते. दोघं एकमेकांना कानशिलात केस ओढत मारहाण केल्याचे दिसते. तिथे उपस्थित असलेले इतर विद्यार्थी हे त्यांना थांबवण्या ऐवजी त्यांची भांडणं पाहत राहिले आणि अनेक लोक हे व्हिडीओ शूट करताना दिसले. काही काळानंतर दुसऱ्या मुली तिथे आल्या आणि त्यांनी त्या मुलींना सांभाळत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून नॉलेज पार्क कोतवाली पोलिसांनी कॉलेज प्रशासनशी संपर्क साधला. सुरुवातीला केलेल्या तपासामुळे ही गोष्ट समोर आली आहे की भांडणाचं कारण खासगी आयुष्यातील काही गोष्टी आहे. दरम्यान, पोलिसांनी कोणा विरोधातही तक्रार दाखल केलेली नाही. 

हेही वाचा : 'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक

कॉलेजनं या प्रसंगानंतर पोलिसांना सांगितलं की यापुढे अशा कोणत्याही गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. तर तपास केल्यानंतर एक गोष्ट समोर आली की त्या विद्यार्थींनीवर कडक कारवाई करण्यात येईल. तर दुसरीकडे कॉलेजमध्ये असलेल्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना कॉलेजकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. त्यासोबत हा सवाल केला आहे की जेव्हा घटना झाली तेव्हा कॉलेजचे गार्ड कुठे होते.