www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेतील इमारत विभाग आणि नगररचना विभागतील फायली गहाळ झाल्यात. इमारत विभागातील ३१४ तर नगररचना विभातील आठ फाईल्स गहाळ झाल्यात. मात्र, पालिका प्रशासनानं या गहाळ झालेल्या फाईल्स संदर्भात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
मुंबई महापालिकेच्या इमारत विभाग आणि नगर रचना विभागातील तब्बल ३२२ फाईल्स गहाळ झाल्यात. १९९१ ते २००९ पासून या फाईल्स गहाळ आहेत. यात वांद्रे पूर्व-पश्चिमेच्या ८४ आणि अंधेरी पूर्व – पश्चिमच्या २१२ फाईल्स गहाळ झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झालीय. वांद्रे ते ओशिवरा परिसरातील भूखंडाच्या आरक्षणाच्या या फाईल्स पालिका अधिकारी आणि विकासकांनी संगनमताने गहाळ केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय.
पालिका आयुक्त आणि अधिकारी या गहाळ झालेल्या फाईल्सबाबत उत्तर देत नाहीत. मात्र, मुंबईच्या महापौर सुनील प्रभू यांनी तर या फाईल्स रिमार्कसाठी इतर विभागात गेल्या असण्याची शंका उपस्थित करत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केलाय.
पालिका आयुक्त्तांनी पालिका अधिनियमांतर्गत गहाळ फाईल्सचा तपास करावा, असा आदेश इमारत विभाग आणि नगर रचना विभागाला दिलाय. मात्र, गहाळ फाईल्स संदर्भात खळबळ निर्माण होऊनही पालिका प्रशासनाने या गहाळ झालेल्या फाईल्स संदर्भात अद्याप पोलिसात तक्रार का दाखल केलेली नाही, असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.