१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम

१२ मार्च १९९३ रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या  बॉम्बस्फोटात २५७ जण ठार तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. भारतात झालेले हे बॉम्बस्फोट शक्तिशाली होते. हे स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. भारतीय भूमीवर प्रथमच एवढा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

Updated: Jul 30, 2015, 09:23 PM IST
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम  title=

मुंबई : १२ मार्च १९९३ रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या  बॉम्बस्फोटात २५७ जण ठार तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. भारतात झालेले हे बॉम्बस्फोट शक्तिशाली होते. हे स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. भारतीय भूमीवर प्रथमच एवढा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

या स्फोटाचा घटनाक्रम :
- दुपारी १.३० वाजता मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजळ्यावर स्फोट झाला. यात ८४ ठार तर २१७ जण जखमी झालेत.

दुपारी २.१५ वाजता नरसी नाथा स्ट्रीट, कथा बाजार, ४ ठार, १६ जखमी

दुपारी २.३० वाजता पेट्रोल पंप, शिवसेना भवन, ४ ठार, ५० जखमी

दुपारी २.३३ वाजता एअर इंडिया इमारत, नरिमन पॉईंट, २० ठार, ८७ जखमी

दुपारी २.४५ वाजता मच्छीमार वसाहत, माहीम. ३ ठार, ६ जखमी

दुपारी २.२५ वाजता सेंच्युरी बाझार, वरळी. ११३ ठार, २२७ जखमी

दुपारी ३.०५ वाजता झवेरी बाझार. १७ ठार, ५७ जखमी

दुपारी ३.१० वाजता हॉटेल सेना रॉक, बांद्रा

दुपारी ३.१३ वाजता प्लाझा सिनेमा, दादर. १० ठार, ३७ जखमी

- दुपारी ३.२० वाजता हॉटेल जुहू सेंटर, ३ जखमी

दुपारी ३.३० वाजता सहार विमानतळाजवळ

दुपारी ३.४० वाजता हॉटेल एअरपोर्ट सेंटर, २ ठार, ८ जखमी.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.