याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत

बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.

ANI | Updated: Jul 30, 2015, 02:08 PM IST
याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत title=

मुंबई : बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.

१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला आज नागपूरच्या जेलमध्ये फाशी देण्यात आली. याकूब मेमन वकिलांनी ऐनवेळी फाशीच्या शिक्षेला खोडा घालण्यासाठी दाखल केलेली अखेरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज पहाटे पाच वाजता फेटाळून लावल्यानंतर सकाळी याकूबला फाशी देण्यात आली. 

याकूबच्या फाशीमुळे अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले सहन केले जाणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. याकूबने देशातील निरपराध नागरिकांचा बळी घेतला होता. त्यांनाही आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असे राऊत म्हणालेत. 

आपल्या देशातील काही जण अखेरपर्यंत याकूबला दया देण्यासाठी लढत होते. त्यांना वाटते त्यांच्या म्हणण्यानुसार देश चालतो. पण, तसे होत नाही. देश हा कायदा आणि सुव्यवस्था, जनभावनेनुसार चालतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेय. अशा नागरिकामुळे देशात कसाबसारखे दहशतवादी घुसतात आणि मेमनसारखे तयार होतात, असे राऊत म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.