राणे विरूध्द ठाकरे पुन्हा एकदा

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. वरळीत गाडी ओव्हरटेक करण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर हा वाद वरळी पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला.

Updated: Oct 2, 2011, 12:18 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे पुन्हा  एकदा आमने  सामने  आले आहेत. वरळीत गाडी ओव्हरटेक करण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.  त्यानंतर हा वाद वरळी पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला.  आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकांनीवरळी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या प्रकाराची तक्रार केली.  नितेश राणेंच्या गाड्यांचा ताफ्याने आदित्य ठाकरेंच्या गाडीला दाबण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वरळी पोलिस ठाण्यात करण्यात आली.  दरम्यान या दोघांमध्ये कुठलीही बाचाबाची झाली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलय.  तसचं या दोघांमध्ये दुस-यांदा या कारणावरून वाद झाल्याचंही पोलिसांनी सांगितलय.  तर  असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं नितेश राणे यांचं म्हणणं आहे.

 

 

[caption id="attachment_511" align="alignleft" width="300" caption="राणे आणि ठाकरे वाद पुन्हा एकदा"][/caption]

ठाकरे आणि  राणे अवघ्या महाराष्ट्राला माहीत असलेली ही  दोन नामांकित घराणी.. नारायण  राणेनीं शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यापासून तर या  दोन्ही  घराण्यातील सदस्यांमध्ये विस्तव  जात नाहीये..  नारायण  राणे व उध्दव  ठाकरे यांच्यातील मतभेद तर सा-यांनाच ठाऊक  आहे.  यांच्यातील वाकयुध्द तर सर्वश्रुतच आहे..  त्यांनी एकमेंकांवर केलेले वैयक्तिक आरोपांनी तर सा-या गोष्टीचीं परिसीमाच गाठली होती..  काल पुन्हा एकदा राणे  विरूध्द  ठाकरे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला  पण  हा वाद झाल्याय तो आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांचामध्ये.. एकुणच या दोन कुटूंबातील दरी दिवसेंदिवस वाढतच चाललीये..

 

 

मुबंईत  काल वरळी  भागात गाडी  ओव्हरटेक करण्यावरून युवासेनेचे आदित्य  ठाकरे आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे  यांच्यात काल वाद झाल्यानंतर वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यानंतर  वरळी पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. आता आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवण्यात आलीयं.