मुलाला मारहाण झाली म्हणून आईचं आत्मदहन

अंबरनाथ शहरात एका महिलेनं मुलाला मारहाण झाली म्हणून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा यादव असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर उल्हासनरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Updated: Nov 9, 2011, 05:35 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

अंबरनाथ शहरात एका महिलेनं मुलाला मारहाण झाली म्हणून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा यादव असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर उल्हासनरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

मनसे आमदार राम कदम यांच्या अंगरक्षकानं आपल्या मुलाला मारहाण केल्यामुळे आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. अंबरनाथमध्ये राहणा-या पुष्पा यादव यांचे पती पडोई यादव यांची विक्रोळीत गोरखनाथ नावाची पतपेढी आहे. ऑगस्ट २०११ मध्ये ही पतपेढी बंद पडली. ठेवीदारांचे पैसे परत कसे करायचे हा प्रश्न यादव दाम्पत्याला भेडसावत होता. ठेवीदारांचे पैसे परत करता यावे याकरता मनसे आमदार राम कदम यांनी मध्यस्ती केली होती.

 

दरम्यान कदम यांच्या अंगरक्षकानं यांच्या कार्यालयात पुष्पा यादव यांच्या मुलाला नेऊन मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या पुष्पा यादव यांनी जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसात रामचंद्र यादव, दशरथ जाधव, शिवबच्चन यादव, राजू, राम कदम आणि एका महिलेविरोधात  गुन्हा दाखल झाला आहे. अंबरनाथ पोलिसांनी हे प्रकरण घाटकोपर पोलिसांकडे वर्ग केलं आहे.