मुंबई लोकल बॉम्बस्फोटाला सहा वर्ष

११/७ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांत अनेक जण मृत्यूमुखी पडले तर अनेकांचं जीवन यात उद्धस्त झाले. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. या साखळी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना माहिम रेल्वे स्टेशनवर श्रद्धांजली वाहण्यात आली.

Updated: Jul 11, 2012, 06:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

११/७ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांत अनेक जण मृत्यूमुखी पडले तर अनेकांचं जीवन यात उद्धस्त झाले. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. या साखळी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना माहिम रेल्वे स्टेशनवर श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुंबईत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाला आज सहा वर्ष पूर्ण झालेत. पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड, माहिम, बांद्रा, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या स्टेशन्सवर ११ जुलै २००६ च्या संध्याकाळी अगदी गर्दीच्यावेळी संध्याकाळी  बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये १८६ जण ठार तर जवळपास ९०० जण जखमी झाले होते. या स्फोटात जखमी झालेल्यांना तसचं

बॉम्बस्फोटातल्या काही मृतांच्या नातेवाईकांना अजूनही मदत मिळालेली नाही. या स्फोटांचा तपास करणा-या एटीसकडे मात्र अजुनही आरोपींबाबत ठोस माहिती नसल्याचं दिसतयं. या स्फोटांमागे सिमीचा हात असल्याचं एटीस एकीकडे म्हणतयं तर त्याच बरोबर पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचा या स्फोटामागे हात असल्याचही सांगितलं जातंयं.