राज्य सरकार अपयशी - राष्ट्रवादी

राज्यात दुष्काळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा, घरचा आहेर राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

Updated: Jul 11, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यात दुष्काळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा, घरचा आहेर राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.

विधानसभा आणि विधान परिषदेत दुष्काळाच्या मुद्द्यावर वादळी चर्चा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत, दुष्काळात अधिका-यांनी निर्णयाक भूमिका घेतली नसल्याची टीका केलीय. अशा अधिका-यांवर कारवाचे धाडस पुनर्वसन मंत्री दाखवतील काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

२००६नंतर राज्यात पुन्हा दुष्काळ पडतो, हे सरकारचं अपयश असल्याचंही ते म्हणालेत. पालकमंत्र्यांनी केवळ जिल्हा स्तरावर बैठका घेतल्या, पण अंमलबजावणीचं काय झालं, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

काही आमदारांनी मतदारसंघ दुष्काळी भागात समाविष्ट करुन निधी लाटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, सामान्य नागरिकांना तुमच्या मदतीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलय.