मुंबईत तब्बल 117 किलो ड्रग्ज जप्त

मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. गेल्या एका महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 14 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त केलंय.

Updated: Aug 8, 2012, 03:20 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. गेल्या एका महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 14 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त केलंय.

 

मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. मुंबई क्राइम ब्रांचच्या एएनसी विभागाने महिन्याभरात संपूर्ण मुंबईत टाकलेल्या छाप्यात कोकेन, चरस, एम्फेटामाईन, हिरोईन, गांजा जप्त केलाय. एकूण 117 किलो वेगवेगळे ड्रग्स पोलिसांनी जप्त केलंय. ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकूण 28 आरोपींना अटक केलीय. तर ड्रग्ससेवन केल्या प्रकरणी तब्बल 408 जणांना अटक केलीयं.

 

धक्कादायक बाब, म्हणजे अटक करण्यात आलेल्या नाजेरियन नागरिकांकडून एका नव्या मोडस ऑपरेंडीचा खुलासा झालाय. ड्रग्स विकणारे नायजेरियन ‘स्टुडंट व्हिजा’वर भारतात येतात आणि इथल्या महिलांना प्रेमाचा जाळ्यात अडकवून त्यांचाशी लग्न करतात. इथेच स्थायिक झाल्यावर मुलीच्या घराचा वापर ते ड्रग्स विकण्यासाठी करतात. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्स हे दक्षिण मुंबईतून जप्त करण्यात आलेत. मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज नेमकं कुणासाठी आणण्यात आलं होतं याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

.