मुंबईचे आयुक्त जाणार, आता कोण येणार?

मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार आज निवृत्त होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच, त्यांनी सुबोधकुमार यांच्या नावाचा आग्रह धरत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती.

Updated: Apr 30, 2012, 04:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार आज निवृत्त होत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेताच, त्यांनी सुबोधकुमार यांच्या नावाचा आग्रह धरत मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती.

 

त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये अनेकदा वाद रंगले. दरम्यान, सुबोधकुमार यांच्या निवृत्तीनंतर आता नवे आय़ुक्त कोण येणार, याची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. यात प्रामुख्याने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असल्याचं बोललं जातं आहे.

 

यात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ए. के. जैन यांची आयुक्तपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांचंही नाव चर्चेत आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी यांनाही आयुक्तपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.