आदर्श घोटाळा, अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल

आदर्श सोसायटीप्रकऱणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. ईडी अशोक चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. सदनिका घेताना सदनिका खरेदीसाठी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Updated: Apr 30, 2012, 03:59 PM IST

www.24taas.com, मुंबई

आदर्श सोसायटीप्रकऱणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. ईडी अशोक चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. सदनिका घेताना सदनिका खरेदीसाठी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्यांच्यासह आदर्शप्रकरणी आरोपी असलेल्या इतर १३ जणांवरही गुन्हे दाखल कऱण्यात येणार आहेत अशी माहिती ईडीनं मुंबई हायकोर्टात दिली. एकीकडं आदर्श प्रकरणी आयोगानं अशोक चव्हाणांना दिसाला दिला असला तरी आता त्यांच्यामागे इडीचा फेरा लागला आहे.

याशिवाय याच प्रकरणी विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब कुपेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह १५ जणांच्या विरोधात चौकशी करून चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.