www.24taas.com, हेमंत बिर्जे, मुंबई
मुंबईत बुधवारी रात्रभर पडणाऱ्या पावसानं मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरवले. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं ऑफिसला जाणा-यांचे हाल झाले. पण हे पाणी मुंबईच्या महापौरांना दिसलंच नाही. ठिकठिकाणी साचलेलं पाणी, ट्रॅफिक जाम असे अडथळे पार करत अनेक मुंबईकर काल ऑफिसला उशिरा पोहोचले.
इतकं होऊनही मुंबई जलमय झालीच नव्हती, असा आश्चर्यकारक दावा मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी केलाय. गुरवारी २८ जूनच्या पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. मुंबई जलमय झाली तरी मुंबईच्या महापौरानी पालिका प्रशासनाला शाब्बासकीची थाप दिलीयं. मात्र महापौराना महापालिकेचे दावे कसे फोल ठरलेत ते झी २४ तासच्या कॅमे-यांतना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
वांद्रे सकाळी साडेआठ ( २८ जून)
वांद्रे इथं सकाळी साडेआठच्या सुमारास अशी स्थिती होती. दमदार पावसानं पावसानं रस्त्यावर पाणी आलं होतं. त्यातुन मार्ग काढणं बिकट झालं होतं.
अंधेरी सकाळी दहा ( २८ जून)
अंधेरीत पावसानं झालेली दैना तर महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरवणारी होती.अंधेरी सबवे इथल्या नाल्याच पाणी रस्त्यावर आल्यानं कामावर जाणा-यांचे हाल झाले. या पाण्यातून कसरत करत त्यांना ऑफिसेस गाठावी लागली. त्यातून अनेकांचे लेटमार्क लागले. विद्यार्थांचे तर जास्त हाल झाले. पाठीवर दप्तर त्यात बरसणार पाऊस यामुळं शाळेत जाताना त्यांची धांदल उडाली.
कुर्ला सकाळी ११.३० ( २८ जून)
कुर्ल्यात स्टेशनजवळ दुकानांमध्येच पाणी शिरलं. तळ्यासारखी स्थिती तळ्यासारखी स्थिती निर्माण झाल्यान रेल्वेही ठप्प झाली होती.इतकं होऊनही मुंबई जलमय झालीच नव्हती, असा आश्चर्यकारक दावा मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी केलाय. महापालिकेनं २१३ ठिकाणी पंप लाऊनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळं नालेसफाईचा गाजावाजा करणा-या महापालिकेचे दावे फोल ठरले. पहिल्या पावसानं मुंबईकरांचा मनस्ताप सहन करावा लागलायं. आणि पालिकेचे नालेसफाईचे दावे फौल ठरवलेत.