टीम अण्णा भ्रष्ट, बाळासाहेबांनी केलं स्पष्ट

टीम अण्णावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानेच अण्णा हजारे यांना भेट नाकारल्याचं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. मी अण्णा नाही, असं म्हणत त्यांनी अण्णांच्या आवाजाची नक्कलही केली.

Updated: Apr 29, 2012, 03:52 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

टीम अण्णावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानेच अण्णा हजारे यांना भेट नाकारल्याचं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. मी अण्णा नाही, असं म्हणत त्यांनी अण्णांच्या आवाजाची नक्कलही केली. सेलीब्रेटी 'मी अण्णा आहे' अशा टोप्या घालून मिरवतात. त्यावरही बाळासाहेबांनी कोटी केली. 'शबाना आझमी डोक्यावर टोपी घालतात, त्यावर लिहलेलं असतं मै अण्णा हजारे हूँ! हे कसं काय शक्य आहे.

 

'मी रोज ३० ते ४० वृत्तपत्र वाचतो, वाईनही पितो', 'मी काही अण्णा हजारे नाही... सारखं म्हणायचं भारत माता की जय'.  असं म्हणत बाळासाहेबांनी अण्णांवर ठाकरी भाषेत टीका. सचिनची राज्यसभेतली खासदारकी म्हणजे काँग्रेसचा डर्टी पिक्चर असल्याची टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे. सचिनला किंवा क्रिकेटला राज्यसभेत काय स्कोप असणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

 

'तर त्यांनी मंत्र्यांवरही टीका केली. 'गाडीत बसल्यावर मी झोपत नाही, मी सर्वत्र लक्ष्य ठेवतो, मी मिनिस्टर नाही, मी कुठंही बाहेर जातो तेव्हा गाडीत झोपत नाही, मी जागा असतो. मी काही मंत्री नाही'.  तसचं आताच्या व्यंगचित्रावरही बाळासाहेबांनी टीका केली. 'पूर्वी आर. के. लक्ष्मण यांची पॉकेट कार्टून यायचं आताही येतात, ती पाहून असं वाटतं यापेक्षा पॉकेटमार झालेलं बरं'. 'आजच्या व्यंगचित्रकारांना व्यंगचित्रकलेची शैलीच नाही'. 'आता कार्टून काढताना हात थरथरतात'.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 'कार्टून वॉच' या व्यंगचित्रकलेला वाहिलेल्या मासिकाकडून जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मुंबईत मातोश्री या निवासस्थानी हा पुरस्कार सोहळा रंगला. 'कार्टून वॉच' हे रायपूरमधून प्रसिद्ध होणारं मासिक आहे. याआधी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, अबिद सुरती, अजित नैनन आणि प्राण यांना गौरवण्यात आलं आहे.