'ज्वेलर' गिरणी कामगार !

गिरणी कामगारांना वाटाण्याच्या अक्षता लावणारं सरकार एका ज्वेलरवर मात्र मेहरबान झालं आहे. गिरणी कामगारांच्या कोट्यातून प्रविण जैन या ज्वेलरला घर मंजूर केल्याचं पत्रच झी २४ तासच्या हाती लागलं आहे.

Updated: Jan 26, 2012, 09:11 PM IST

पंकज दळवी, www.24taas.com,  मुंबई

 

गिरणी कामगारांना वाटाण्याच्या अक्षता लावणारं सरकार एका ज्वेलरवर मात्र मेहरबान झालं आहे. गिरणी कामगारांच्या कोट्यातून प्रविण जैन या ज्वेलरला घर मंजूर केल्याचं पत्रच झी २४ तासच्या हाती लागलं आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे गिरणी कामगारांची घरं लाटणारं रॅकेटच या मागे असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.

 

मुंबईतले गिरणी कामगार हक्काच्या घरासाठी सरकार दरबारी चपला झिजवत आसताना दुसरीकडे गिरणी कामगारांच्या तोंडाला आश्वासनांची पानं पुसणारं सरकार एका ज्वेलरवर मेहरबान झालं आहे. गिरणी कामगारांच्या कोट्यातून प्रविण जैन या ज्वेलरला घर मंजूर केल्याचं पत्रच झी 24 तासच्या हाती लागलं आहे. जोगेश्वरीला  राहणारे प्रविण जैन  किंवा त्यांचे नातेवाईक गिरणीची पायरीसुद्धा कधी चढले नाहीत. मग सरकारनं मात्र असं मेहरबान का व्हावं हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

प्रवीण जैन यांना नागरी कमाल धारणा गिरणी कामगार कोट्यातून मोरारजी मिल, गोरेगाव किंवा कांदिवली पूर्व येथे एक घर मंजूर करण्यात आलं... त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे गिरणी कामगारांची घरं लाटणारं रॅकेटच या मागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

गिरणी कामगारंचा संघर्ष गेली ३० वर्ष सुरू आहे. तरीही गिरणी कामगारांबाबत सरकारचं धोरण अजूनही नक्की होत नाही. त्यातच एका ज्वेलरला गिरणी कामगारांच्या कोट्याटून घर मिळाल्याची कागदपत्रं सापडली आहेत. जैन यांना मंजूर झालेलं हे घर ताबडतोब रद्द करावं, अशी मागणी गिरणी कामगारांनी केली आहे.

 [jwplayer mediaid="36213"]