आज सरकारी कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

आघाडी सरकारच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक संप पुकारला. राजपत्रित अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक या संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नसले, तरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ते काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

Updated: Nov 15, 2011, 10:41 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आघाडी सरकारच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक संप पुकारला. राजपत्रित अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक या संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नसले, तरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ते काळ्या फिती लावून काम करणार आहेत. केंद्रांच्या धर्तीवर वेतनवाढ आणि अन्य सवलती देण्याचं राज्य सरकारनं तत्वत: मान्य केलं असलं, तरी केंद्राच्या अनेक लाभापासून सरकारी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवलं.

 

वाढीव महागाई भत्यापोटी ३२ महिन्यांची थकबाकी रोखीने देण्यात यावी. पाच दिवसांचा आठवडा करण्यात येऊन सेवानिवृत्तीचं वय ६२ करावं. केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक आणि होस्टेल भत्ता मंजूर करावा. तसच रिक्त पदांची भरती करतांना अनुकंपा तत्वावरील सेवा भरतीस प्राधान्य देण्यात यावं, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला.