निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत शस्त्रसाठा जप्त

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतल्या मतदानाच्या तोंडावर मुंबईत हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ पिस्तूल, ६ रिव्हॉल्व्हर आणि १२ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत.

Updated: Feb 14, 2012, 08:26 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतल्या मतदानाच्या तोंडावर मुंबईत हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ पिस्तूल, ६ रिव्हॉल्व्हर आणि १२ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत.

 

हत्यारांचा हा साठा मुंबई निवडणुकांसाठी आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. कुर्ला टर्मिनस स्टेशनबाहेर पोलिसांनी बिहारहून हत्यार घेऊन   येणाऱ्या जावेद आलम शब्बीर या आरोपीला अटक केलं आहे.

 

आरोपी जावेद हा काही महिन्यांपूर्वी एचडीएफसी बॅंकेत काम करत होता. बारावी पर्यंत शिकलेला जावेदने ही हत्यारं कुणाचा सांगण्यावरून  आणली आणि कोणाला देणार होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.