विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यू

बैलगाडी विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यु झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर शिवारात घडलीय. भगवान राऊत असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी आहे. 

Updated: Oct 23, 2016, 07:34 PM IST
विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यू title=

नांदेड : बैलगाडी विहिरीत पडून एका तरुणासह 2 बैलांचा मृत्यु झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर शिवारात घडलीय. भगवान राऊत असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी आहे. 

मात्र सध्या तो त्याच्या मामाकड़े राहत होता. भगवान बैलगाड़ी घेऊन शेतात जात होता. 

मात्र बैलगाड़ीला जुंपलेल्या बैलाचा पाय घसरल्यानं बैलगाडीसह भगवान विहिरीत कोसळला.त्यानंतर आजुबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर जमलेला जमावाने भगवानला विहीरीबाहेर काढल. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झालेला होता.