दिवाळीत यावर्षीही सर्वसामान्यांचं दिवाळं काढणार

यावर्षीच्या दिवाळीतला प्रवासही तुम्हाला महागात जाणार आहे. एसटी महामंडळानं यावर्षीपासून परिवर्तनशील भाडेवाड लागू केली आहे. 

Updated: Oct 23, 2016, 07:31 PM IST
दिवाळीत यावर्षीही सर्वसामान्यांचं दिवाळं काढणार title=

नाशिक : यावर्षीच्या दिवाळीतला प्रवासही तुम्हाला महागात जाणार आहे. एसटी महामंडळानं यावर्षीपासून परिवर्तनशील भाडेवाड लागू केली आहे. 

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या हंगामात दहा ते वीस टक्के भाडेवाढ लागू केली जाणार आहे. 

22 ते 24 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 5,6 नोव्हेंबर आणि 12 ते 14 नोव्हेंबर या दिवसांमध्ये ही वाढ लागू करण्यात येईल. तर सुटट्या संपल्यानंतर पुऩ्हा पूर्वीचेच दर लागू केले जाणार आहेत.