महिलांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांवर चपला भिरकावल्या

कोल्हापुरातील टोलचा प्रश्न नवीन सरकार आल्यावरही सुटत नाहीय, देवेंद्र फडणवीस सरकारनेही यावर कोणतीही ठोस पावलं उचलेली नाहीत.

Updated: Nov 20, 2014, 06:27 PM IST
महिलांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांवर चपला भिरकावल्या title=

कोल्हापूर : कोल्हापुरातील टोलचा प्रश्न नवीन सरकार आल्यावरही सुटत नाहीय, देवेंद्र फडणवीस सरकारनेही यावर कोणतीही ठोस पावलं उचलेली नाहीत.

टोलविरोधात कोल्हापुरातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सकाळपासूनच कळंबा टोलनाक्यावर आंदोलकांची रेलचेल होती. घोषणाबाजीने हा परिसर दुमदुला होता. त्यातच कर्मचाऱ्यांनी टोलवसुलीचा प्रयत्न केल्याने, महिलांनी टोल कर्मचाऱ्यांना चपलांचा प्रसाद दिला.

कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून टोलविरोधात लढा सुरुच आहे. टोल विरोधी कृती समितीने आज कळंबा टोल नाक्‍यावर आंदोलन केलं. इथे टोल कर्मचारी टोलवसुली करत होते.

टोलकर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना टोल देण्यासाठी अरेरावी केली. त्यामुळे महिलांनी रणरागिणींचा अवतार घेत, कर्मचाऱ्यांवर चपला भिरकावल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.