पुण्यातल्या भिंतींवर लागलेल्या त्या उर्दू मजकुराचा अर्थ काय?

पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवर उर्दू भाषेत लिहण्यात आलेल्या मजकुरामुळे पुण्यात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 

Updated: Aug 14, 2016, 09:13 PM IST
पुण्यातल्या भिंतींवर लागलेल्या त्या उर्दू मजकुराचा अर्थ काय? title=

पुणे : पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवर उर्दू भाषेत लिहण्यात आलेल्या मजकुरामुळे पुण्यात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयाबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठासमोरच्या बाणेरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीवरही काळ्या शाईने असाच मजकूर लिहण्यात आला आहे. 

उर्दू भाषेतील या मजकुराचा अर्थ 'शहिद ए करबला' असा आहे. प्रेषीत मोहंमदांचे कुटुंबीय करबलाच्या युध्दात मारले गेले होते. तेव्हापासून मुस्लिम समाजाकडुन युध्दाचा तो दिवस शहीद दिनासारखा साजरा केला जातो. त्या दिवसाची आणि हुतात्मा झालेल्यांच्या आठवणीत  शोक केला जातो. 

आता आयसीसकडून इतिहासातील त्या घटनेचा उपयोग तरुणांना आयसीसच्या जाळ्यात अडकवण्यासाठी केला जात आहे, त्यामुळे पोलीस अधिक्षक कार्यालय आणि उड्डाणपुलाच्या भिंतीवर लिहलेला हा मजकूर नेमका कोणत्या उद्देशाना लिहला असावा याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. 

दहशतवादविरोधी पथकाकडूनही या मजकुराबाबत माहिती घेतली जात आहे. हा मजकुर कोणी, कधी आणि कोणत्या उद्देशानी लिहला असावा याबद्द्ल ए.टी.एस.चे अधिकारी माहिती घेत आहेत.