'पुण्यातल्या विद्वानांमुळे रखडली मेट्रो'

पुणे विद्वान लोकांचं शहर आहे, पण विद्वान लोकांची संख्या वाढल्यामुळे पुण्यातील मेट्रो खोळंबल्याचा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. 

Updated: Aug 14, 2016, 05:27 PM IST
'पुण्यातल्या विद्वानांमुळे रखडली मेट्रो' title=

पुणे : पुणे विद्वान लोकांचं शहर आहे, पण विद्वान लोकांची संख्या वाढल्यामुळे पुण्यातील मेट्रो खोळंबल्याचा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. 

देशातील पहिल्या बायो सीएनजी बनविणा-या देशातील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी गडकरी बोलत होते. 

नागपूर मधील मेट्रो बाबत आम्ही दोन तासात निर्णय घेतला. कोणत्याही  अंमलबजावणी मध्ये सपाटा लावा असाही टोला त्यांनी गिरीश बापट यांना लगावला. नागपूर मध्ये 60 बसेस बायो फ्युअल वर चालतात. आज  पुण्यातील प्रदुषण कमी करण्यासाठी देखील अशात प्रकल्पाची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.