कोल्हापूर : आम्ही जर सत्तेत असलो तरी विकास होत नसेल तर आम्ही बोलणार. आम्ही जनतेला जी आश्वासन दिली आहेत. त्याची पूर्तता झाली आहे. कोल्हापूरचा टोलचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी सोडवला. राज्य सरकारने सोडविला नाही. भाजपने निवडणुकीच्या आधी खूप आश्वासने दिलीत. मात्र, निवडून आल्यानंतर त्याकडे पाठ दाखवलेय. प्रश्न काही सोडविलेले नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आज कोल्हापुरात ढाण्या वाघ एकटा लढतोय, असे सांगितले.
भाजप आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल उद्धव यांनी केला. साबरमतीनंतर बारामती. बारामतीत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन विकास केला. ते पापाचे धनी आहेत. शेतकरी जगला तर आपण जगू. बारामतीचा विकास केला मग कोल्हापूरने काय केलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात, कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटी बनवून राज्यातील आदर्श शहर म्हणून होईल, असे सांगतात. आम्ही म्हणतो, संपूर्ण राज्य स्मार्ट का नको? कोल्हापूरने काय केलंय. आमच्या हातात सत्ता द्या, बघा काय विकास असतो तो, असे रोखठोक उद्धव यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- मी करवीरनगरीत पुन्हा येईन तो महापौर यांना घेऊन तिच्या दर्शनाला.
- विकास काय असतो ते दाखवून देऊ. सरकारमध्ये असलो तरी युती झाली नाही म्हणून आम्ही घाबरणार नाही. चूक आहे ते चूक. विकास व्हायलाच पाहिजे. तरच तुमच्या समोर ताठ मानेने बोलणे.
- भाजपला सईद चालतो मात्र, शिवसेना चालत नाही.
- कल्याण-डोंबविलीला स्मार्ट सिटी बनवू. मग कोल्हापूरने काय केलंय?
- करायचं असेल तर सर्व राज्य स्मार्ट करा.
- राष्ट्रवादीला जनतेनेच रस्त्यावर आणले.
- बारामतीची मी माफी मागतो. हट, मी पवारांची माफी मागत नाही. आधी गरिबांची लाटलेली शेती परत करा, मग बारामतीला येईन.
- बारामतीत मी पाऊल ठेवणार नाही. असा विकास आम्हाला नको. कोल्हापूरचा विकास का केला नाही?
- कोल्हापूरचा टोल एकनाथ शिंदे यांनी बंद केला.
- टोल नाका बंद का केला नाही, राज्य सरकारने का बंद केला नाही.
- लोकांना तुम्ही का फसवता, टोल बंद करण्याचे आश्वासन दिले.
- कोल्हापूर वीरांची भूमी आहे. तिकडे भगवाच शोभतो.
- उद्धव ठाकरे यांचे भाजप सरकारवर सडकून टीका, निवडणुकी आधी अनेक आश्वासन दिलीत. मात्र, प्रश्न काहीही सोडविलेले नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.