कोल्हापूर पालिका निवडणूक

उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरच्या सभेत पुन्हा भाजपवर निशाणा साधला

 आम्ही जर सत्तेत असलो तरी विकास होत नसेल तर आम्ही बोलणार. आम्ही जनतेला जी आश्वासन दिली आहेत. त्याची पूर्तता झाली आहे. कोल्हापूरचा टोलचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी सोडवला. राज्य सरकारने सोडविला नाही. भाजपने निवडणुकीच्या आधी खूप आश्वासने दिलीत. मात्र, निवडून आल्यानंतर त्याकडे पाठ दाखवलेय. प्रश्न काही सोडविलेले नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आज कोल्हापुरात ढाण्या वाघ एकटा लढतोय, असे सांगितले.

Oct 28, 2015, 09:20 PM IST