पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय.
गोविंद पानसरे गोळीबार आणि हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केलीय. त्यानंतर उदयनराजेंनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले संतापाच्या भरात काय बोलतील आणि काय नाही याचा नेम नाही... आत्तापर्यंत याचा प्रत्यय अनेकदा आलाय... याचाच प्रत्यय यावेळी पुन्हा एकदा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आला.
'कृष्णा खोरे प्रकल्प योग्य रीतीने हाताळला गेला नाही... दिलेला शब्द पाळला असता तर, ही परिस्थिती आलीच नसती' असा वार उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांच्यावर केलाय.
'अॅन्टी करप्शन ब्युरोला वकिलांमार्फत उत्तरं काय देता... तुम्ही केलंय तर आता तुम्हीच उत्तर द्या...' असा टोला भोसलेंनी पवारांना लगावलाय. 'चुकीचं केलं असेल तर मग तो कुणीही असला तरी कारवाई व्हायला हवी' असं उदयनराजेंनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.