शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार

येथील महागाव इथे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर झालेली दगडफेक ही शिवसेनेच्या गुंडांकडून झाल्याचा घणाघाती आरोप आमदारांनी केला आहे.

Updated: Jun 28, 2016, 08:55 AM IST
शिवसेनेच्या गुंडांकडून कार्यालयावर दगडफेक : भाजप आमदार title=

यवतमाळ : येथील महागाव इथे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर झालेली दगडफेक ही शिवसेनेच्या गुंडांकडून झाल्याचा घणाघाती आरोप आमदारांनी केला आहे.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा शिवसेनेच्या गटाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणालेत. महागाव इथं आयोजीत शेतक-यांच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय मोर्चानंतर भाजप आमदार संपर्क कार्यालयावर दगडफेक झाली. 

या दगडफेकीत भाजप शहर अध्यक्ष गंभीर जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याने परिस्थिती चिघळली त्यात काही शेतकरी जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी ९ आंदोलकांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.