जळगावात दोघा जुगारी नेत्यांना अटक

येथे दोन जुगारी राजकारण्यांना पोलिसांनी अटक केली. यात एक माजी महापौर आणि अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. 

Updated: Jul 29, 2015, 02:47 PM IST
जळगावात दोघा जुगारी नेत्यांना अटक title=

जळगाव : येथे दोन जुगारी राजकारण्यांना पोलिसांनी अटक केली. यात एक माजी महापौर आणि अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. 

जळगावमधील शिवाजी नगर आणि जुने बस स्थानक या भागात जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी या दोघांना अटक केलीय. हे दोघेही राजकारणी असल्याचा बुरखा पांघरूण सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली जुगार अड्डा चालवण्याचं काम करायचे. मात्र आता दोघेही पकडले गेल्यानं त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलाय. 

या दोघांवर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी माजी महापौर आणि नगरसेवकासह १८ जणांना अटक केलीय. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अडीच लाखांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.