याकूब मेमनची झाली वैद्यकीय चाचणी, फाशीसाठी 'फिट'

 मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्याची तयारी नागपूरमधील कारागृहात सुरू झाली असून बुधवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Updated: Jul 29, 2015, 02:44 PM IST
याकूब मेमनची झाली वैद्यकीय चाचणी, फाशीसाठी 'फिट' title=

नागपूर :  मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्याची तयारी नागपूरमधील कारागृहात सुरू झाली असून बुधवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

फाशीसाठी याकूब मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या फीट असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. 

याकूब यांच्या फाशीला २४ तास शिल्लक असताना याकूबने पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. 

दुसरीकडे, तीन न्यायाधिशांचे खंडपीठ सुप्रीम कोर्टात याकूबच्या अखेरच्या याचिकेवर सुनावणी करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.