मार्च संपला नाही तरच अंगाची लाही लाही!

मार्च महिना अजून संपलेला नसताना सूर्यनारायण मात्र आग ओकतोय. राज्यातल्या तपमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झालीय. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात पारा चाळीस अंशांवर गेलाय. 

Updated: Mar 25, 2015, 08:11 PM IST
मार्च संपला नाही तरच अंगाची लाही लाही! title=

मुंबई : मार्च महिना अजून संपलेला नसताना सूर्यनारायण मात्र आग ओकतोय. राज्यातल्या तपमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झालीय. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात पारा चाळीस अंशांवर गेलाय. 

मुंबईतलं तपमान 34 अंशांवर पोहचलंय तर ठाण्यात पारा 44.1 अंश इतकं तपमान आहे. स्थानिक हवामानात बदल झाल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलीय. 

राज्यातल्या तपमानावर एक नजर... 

मुंबई 34 अंश से.
ठाणे 44.1 अंश से.
पुणे 37 अंश से.
नाशिक 38 अंश से.
औरंगाबाद 39 अंश से.
नागपूर 40 अंश से.
मालेगाव, जळगाव 40 अंश से.
अहमदनगर  40 अंश से.
नांदेड 40 अंश से.
सोलापूर 41 अंश से.
महाबळेश्वर  32 अंश से.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.