मुंबई : राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवडसह, रत्नागिरी, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. अचानकपणे आलेल्या या पावसामुळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेली दोन आठवडे नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते.
पावसाच्या शि़डकाव्यामुळं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. तर अहमदनगर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पावसानं वादळी वा-यासह दमदार हजेरी लावली. नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जास्त पार चढला होता. मात्र आजच्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला. रायग़ड जिल्ह्यातल्या महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये पाऊस बरसला. ऐन लग्न सराईत पावसानं हजेरी लावल्यामुळं वराडी मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली. विदर्भात आज वादळी वा-यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यालाही वादळी वा-यासह मुसळधार पावसानं झोडपुन काढलय. सलग चार तासाहुन अधिक काळ पडलेल्या पावसामुळं जनजीवन तर विस्कळीत झालच पण मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसानही झालय. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला, त्यानंतर काळोख होवुन जोरदार वादळ सुटलं आणि जोरदार पावसाला सुरवात झाली.
अचानक पडलेल्या पावसामुळं नागरीकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसात अनेक ठिकाणच्या घरावरील पत्रे उडुन गेले, काही ठिकाणी मोठ मोठे झाडे उन्मळुन पडली. तर काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडुन पडले. त्यामुळं विजेच्या तारा तुटुन विज पुरवठाही खंडीत झाला, त्यामुळं कोल्हापूर शहरासह जिल्हातील अनेक भागात चार तासाहुन अधिक काळ विज पुरवठा बंद होता. पावस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळं काही सखल भागाता पाणीही साचल होतं.
नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. संध्याकाळपासूनच या परिसरात काळे ढग दाटून आले होते. वादळी वा-याने संपूर्ण महामार्गावर जणू वादळ घोंगावत होतं. शहरात उजेड तर तर घोटी इगतपुरीतील सह्याद्री रांगामध्ये ढगांची गर्दी ऐन मे महिन्यात झाली होती.
विजांचा कडकडाट आणि गारा यामुळे काही ठिकाणी वाहतूक मंदावली होती. तासभर सुरु असलेल्या या पावसाने हळूहळू आपला मोर्चा शहराकडे वळविला. आणि शहरातील विल्होळी पाथर्डी भागाला पावसाचा चांगलाच फटका बसला. यामुळे दारना काठावरील सर्व पिके उध्वस्त झाली. यात भाजीपाला, गहू आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.