एसटीचा संप मागे, दिवाकर रावते यांची मध्यस्ती

२५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी काल पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेतला. त्यामुळे प्रवाशांचे कालपासून होणारे हाल टळण्यास मदत झालेय.

Updated: Dec 18, 2015, 03:09 PM IST
एसटीचा संप मागे, दिवाकर रावते यांची मध्यस्ती title=

नागपूर  : २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी काल पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेतला. त्यामुळे प्रवाशांचे कालपासून होणारे हाल टळण्यास मदत झालेय.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची इंटकच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर तोडगा निघालाय. त्यामुळे दोन दिवसांपासून ग्रामीण भागाची वाहतूक वेठीला धरणारा संप अखेर मागे घेण्यात आला. 

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी संप सुरु होता. त्यामुळे एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरु होते. औरंगाबादमध्ये स्काऊटच्या ७० प्रशिक्षणार्थी विद्या्र्थिनींना या संपाचा फटका बसलाय. या मुली प्रशिक्षणानंतर घरी परतणार होत्या. मात्र संपामुळं त्या औरंगाबादमध्ये अडकल्यात. खासगी वाहनाने जाण्यासाठी पैसे नसल्यानं घरी परतावं कसं असा प्रश्न या विद्यार्थिनींना पडला.