ठाकुर्ली इमारत दुर्घटनेत ९ जण ठार

ठाकुर्लीतल्या मातृकृपा या दोन मजली इमारतीचा भाग कोसळून ९ जण ठार झालेत. अजून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

Updated: Jul 29, 2015, 11:16 AM IST
ठाकुर्ली इमारत दुर्घटनेत ९ जण ठार title=
छाया - एएनआय

ठाणे : ठाकुर्लीतल्या मातृकृपा या दोन मजली इमारतीचा भाग कोसळून ९ जण ठार झालेत. अजून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

ठाकुर्ली मीरानगर भगातील मातृकृपा या दोन मजली इमरतीचा काही भाग रात्री साड़ेदहाच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. यात ७ वर्षांच्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. अजूनही काही लोक ढिगारया खाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

ही इमारत १९७२ सालची असून पालिकेनं तिला धोकादायक म्हणून घोषित केलं होतं. मंगळवारी दुपारी इमारतीमधील काही रहिवाशांनी आपलं घरं रिकामं केलं होतं. मात्र १५ ते २० कुटुंब त्या इमारतीमध्येच होते. रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला आणि ही दुर्घटना घडली. घटनेनंतर एनडीआरएफ, एमएफडी पथक दाखल झालं. परिसर दाट वस्तीचा असल्यानं यंत्रसामुग्री दुर्घटनास्थळी पोहचवण्यात अडचणी येत आहेत.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदत आणि बचावकार्याची पाहाणी केलीय.

मृतांची नावे 

1)टी.व्ही.ईश्वरन (67)
2)उषा कुशन (49)
3)पार्थिक झाँजारिका (10)
4)उषा सुंदरम (48)
5)विनु फ्रांसिस नादार(11)
6) फ्रांसिस नादार (44)

जखमींना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.
1) आशन सुखमरण (50)
2) महेंद्र शर्मा (28)
3) पोनमल ईश्वरन (63) 
4) हितल झंझारिकिया (19)
5) दीपक अनंत रेड्डी (52)
6) सुशील झंझारिकिया (50) तर
7) प्रदीप शर्मा (19) याला सायन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आलेय.

खाजगी रुग्णालय एम्स हॉस्पिटलमध्ये 
1) भाग्यलक्ष्मी 
2) रेखा मालातकर
3) सौख्या यांना दाखल कऱण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.