कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले आणखी एक वादात सापडले आहेत. दोन दिवसांपूर्वीच ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या उगलेंनी महापालिका मुख्यालयात सुरक्षा राक्षकांच्या समोरच आज एकाला मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे.
अशोक शिंदे असं या इसमाच नाव आहे. शिंदे यांच्या आईचा उगले यांच्यासोबत बांधकाम पाडण्यावरून सकाळी वाद झाला. त्यावेळी संताप अनावर झाल्याने शिंदे यांच्या आईने उगले यांच्या अंगावर चप्पल फेकली. याचाच राग मनात ठेऊन जेव्हा शिंदे उगले यांच्या समोर आले तेव्हा उगले यांनी त्याला मारहाण आणि दमदाटी केली.
आजूबाजूला सुरक्षा रक्षक असताना हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ माजली. दरम्यान दोनच दिवसंपूर्वी उगले यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.