पुणे : मागील जवळपास 15 दिवसांपासून पुण्यातील फुरसुंगीतील कचरा डेपोमध्ये पुणे शहराचा कचरा टाकून देण्यास ग्रामस्थानी विरोध केला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचा ढीग साचून आहे. तर दुसरीकडे अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळी परदेश दौऱ्यावर आहे.
या साठलेल्या कचऱ्यामुळं पुणेकरांच्या आरोग्याला धोकाही निर्माण झाला आहे. मात्र असं असताना पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेश दौऱ्यावर गेले आहेत.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आठ दिवस मॅक्सिकोला गेल्या आहेत.
तर पालकमंत्री गिरीष बापट हे 1 मे ते ११ मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. राष्ट्रकुल देशांच्या विधीमंडळ पदाधिकाऱ्यांच्या परीषदेसाठी बापट गेलेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न नेमका कसा निकाली निघणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहेत.