शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा - खडसे, तावडे

युती तुटण्यास आपण जबाबदार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा होता म्हणूनच युती तुटली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंच्या नावामुळेच युती तुटल्याचे म्हटले आहे.

Updated: Oct 2, 2014, 11:11 AM IST
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा - खडसे, तावडे title=

बुलडाणा : युती तुटण्यास आपण जबाबदार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा होता म्हणूनच युती तुटली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंच्या नावामुळेच युती तुटल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्यासाठी भाजपचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे जबाबदार असल्याची टीका जाहीर सभेत केली होती. त्यानंतर भाजपकडून त्यांना उत्तर देण्यात आलेय. 

दरम्यान, एकनाथ खडसे दोन दिवसांच्या बुलडाणा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर होते. परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि नांदुरा येथील प्रचार सभा रद्द करून त्यांनी मुंबई कडे प्रयाण केले.

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे कुटुंबातील अर्थात उद्धव ठाकरेंचं नाव आल्यामुळे युती तुटल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी लातूरमध्ये जाहीर करुन टाकलं. 

उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी आल्याने युतीतल्या जागांच्या संख्येची लवचिकता कमी झाल्याची टीकाही केली. पण भाजपची खरी लढाई ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी असल्याने शिवसेनेच्या टीकेचं उत्तर देणार नाही अस पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीने बीड लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही असं जाहीर केले होत मात्र या निवडणुकीत स्वतः उमेदवार न देता काँग्रेस उमेदवाराच्या पाठी मागे राष्ट्रवादी आपली शक्ती लावतायेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. दम असेल तर राष्ट्रवादी ने ही निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान फडणवीस यांनी यावेळी दिले. ते बीड जिल्ह्यातील नारायण गडावर प्रचार सभेत बोलत होते.

शिवसेनेने कितीही टीका केली तरी आम्ही टीका करणार नाही कारण आमची लढाई सेनेशी नसुन काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे असे स्पष्टीकरण भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेन्द्र फडणवीस यांनी दिलंय. नगरचे भाजपाचे उमेदवार अभय आगरकर यांच्या प्राचारार्थ अयोजीत जाहीर सभेसाठी फडणवीस नगरमध्ये आले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.