शिरपूर-बडोदा एसटी बसला अपघात, ६ ठार

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर एसटी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन ६ ठार तर १० जण जखमी झालेत. रविवारी रात्री दुर्घटना घडलीय. 

Bollywood Life | Updated: Jan 11, 2016, 10:36 PM IST
शिरपूर-बडोदा एसटी बसला अपघात, ६ ठार title=

धुळे : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर एसटी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन ६ ठार तर १० जण जखमी झालेत. रविवारी रात्री दुर्घटना घडलीय. 

शिरपूरहून बडोदाला जाणाऱ्या एसटी बसला नेत्रंग गावाजवळील देडियापाडा जवळ अपघात झाला. ट्रकच्या लाइटच्या उजेडानं एसटी चालकाला अंदाज न आल्यानं हा अपघात घडला.

ही धडक इतकी भीषण होती की एसटी बसचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. दरम्यान, अपघाताची घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील गावकऱ्यांनी अपघात स्थळी पोहचून बचाव कार्य केले.  

दरम्यान या भीषण अपघातात एसटी बस चालक विशाल निकमसह ५ प्रवाशी ठार झाले आहेत, वाहकसह १० प्रवाशी जखमी आहेत. जखमींवर बडोदा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.