सांगली: मराठी साहित्यातील समीक्षकेसाठी आणि समिक्षेतल्या सौदर्यंस्थळाने मराठी वाचकांच्या मनात घर करणारे लेखक अशी ओळख असणारे ज्येष्ठ समिक्षक आणि साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांचं आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं.
२००८ मध्ये सांगलीत झालेल्या ८१ व्या मराठी साहित्य समंलनाचे अध्यक्षपद हातकणंगलेकर यांनी भूषवलं होतं. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विशेष ओळख असणाऱ्या हातकणंगलेकर सर यांनी समिक्षेबरोबरच कसदार लेखन केलं होतं.
१ फेब्रुवारी १९२७ मध्ये कोल्हापूरमधील हातकणंगले इथं त्यांचा जन्म झाला. उच्चशिक्षण घेतल्यावरही हातकणंगलेकर मोठ्या शहरांची वाट न धरता ग्रामीण भागातच राहणे पसंत केले. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९७४ मध्ये आदर्श प्राध्यापक हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. २००८ मध्ये सांगलीत पार पडलेल्या ८१व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.
हातकणंगलेकर यांची साहित्य संपदा
मराठी आणि इंग्रजीत एकूण १५ पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं होतं. मधुकर हातकणंगलेकर यांची अधोरेखिते, साहित्याचे सोबती, मराठी कथा रुप, परिसर, साहित्य विवेक ही पुस्तकं चांगलीच गाजली. याशिवाय विविध मासिकांमध्येही त्यांनी दर्जेदार लिखाण केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.